धानोरा महासिद्ध येथे सरकारी दवाखान्याचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
धानोरा महासिद्ध येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्याचे उद्घाटन आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या दवाखान्याच्या माध्यमातून गावातील व परिसरातील नागरिकांना, तसेच जवळील गावाना, वडगाव, गावकऱ्यांना सुद्धा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.उद्घाटन समारंभाला स्थानिक ग्रामस्थ, आमदार डॉ. कुटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प गावाच्या विकासात मोलाचा ठरेल आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचार घेण्यासाठी मोठी सोय होईल."या दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार, नियमित तपासणी, औषध वितरण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. याशिवाय, गरोदर माता, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, आमदार डॉ. कुटे यांचे आभार मानले.हा दवाखाना ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
