आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक अकोट शहरात उत्साहात संपन्न..स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन...


 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक अकोट शहरात उत्साहात संपन्न..स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक आढावा बैठक शासकीय विश्रामगृह,अकोट येथे उत्साहात पार पडली.या बैठकीत मा.आमदार डॉ. शशिकांत खेडेकर (संपर्क प्रमुख – जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका व महानगरपालिका),मा.आमदार गोपीकिशनजी बाजोरिया (शिवसेना संपर्क प्रमुख),मा.आमदार नारायणराव गव्हाणकर (जिल्हा प्रमुख),जिल्हाप्रमुख मा.चंद्रशेखर पांडे गुरुजी,अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष श्री.डोंगरे साहेब,युवासेना पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख राहुल रामाभाऊ कराळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या बैठकीत मार्गदर्शक मंडळींनी आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी विविध सूचना दिल्या.शाखाप्रमुख ते बूथप्रमुख यांची निवड करून,"गाव तेथे शाखा – परिसर तेथे शाखा" या ध्येयाने संघटना विस्तार करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

🔸 डॉ.खेडेकर यांनी स्पष्ट केले की, "शिवसेनेचा भगवा आगामी निवडणुकांमध्ये फडकविण्यासाठी सर्वांनी तन-मनाने प्रयत्न करावेत."

🔸 गावपातळीवर प्रचाराचा जोर वाढवावा आणि नवीन युवकांना पक्षात सामावून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

🔸 गाव तेथे शिवसेना शाखा निर्माण कराव्यात.

या बैठकीला अकोट तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे,तालुका प्रमुख प्रकाश पाटील गीते यांचे सह शहर पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शेकडो शिवसैनिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत बैठकीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.कार्यक्रमात युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी,शिवसेना शहर प्रमुख प्रसन्न जवंजाळ,मनीष राऊत,शिवसेना शहर संघटक संजय पालखेडे,माजी तालुका प्रदीप पाटील गावंडे,माजी शहर प्रमुख प्रकाश परियाल,जेष्ठ शिवसैनिक देवेंद्र बगेले,अनिल भाऊ ताडे,युवासेना तालुका प्रमुख रितेश उजिडे,उपतालुका प्रमुख प्रभूदास खवले,सर्कल प्रमुख कुणाल खवले,बंडू पाटील सपकाळ,राधेश्याम।मर्दाने,हिवरखेड शहर प्रमुख प्रमोद निळे,दिवाकर भगत,अनिल पिलात्तर,शिवसेना उपशहर प्रमुख विशाल कोडापे,विशाल सत्याल,शुभम गावंडे,कार्तिक खडेकार,शुभम परीयाल,सागर गलांडे,सोनू वडतकार,प्रशांत पालेकर,पुनीत गौर,सागर गौर,अक्षय तेलगोटे,गणेश हिरुळकर,सागर तलोकार,पंकज पालेकर,प्रशांत पालेकर,विशाल गौर,संदीप कहार,अजय बोरकुटे, संदीप कहार,सोनू आवारे,प्रदून्य डिक्कर,जगदीश शिवरकार,विजय विटंनकर,प्रथमेश अंबळकार,महेश सुकोसे,श्याम लबडे,निखिल देशमुख,रमेश दुर्गे,श्याम कंटाळे,गणेश लटपटे, गोपाल येवले,कृष्णा नागरगोजे,सरपंच केलपाणी विठ्ठल नागरगोजे,संजय कराळे,परशुराम लटपटे,संकेत टापरे,चरण सपकाळ,आयुष तिडके,संतोष पालखडे,विजय चावरे या प्रमुख जेष्ठ शिवसैनिक,पदाधिकारी व शिवसैनिक,युवासैनिकांची उपस्थिती होती.या वेळी अनेक नवयुवकांनी शिवसेना व युवासेनेमध्ये प्रवेश केला.मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.भगवा खांद्यावर घेत त्यांनी शिवसेना पक्षासाठी एकदिलाने कार्य करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोट तालुका व शहरातील शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक,युवासैनिक यांनी अथक परिश्रम घेतले. तालुक्यातील युवक व नागरिकांनीही या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशस्वी केला आहे.

Previous Post Next Post