बापूमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धेत निवड....
जळगाव जामोद प्रतिनिधी....
पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे, येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल साहेब, सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. एफ. टी.शेख यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयातील रेड रिबन क्लब च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम बुलढाणा यांच्या वतीने रेड रन ही जिल्हास्तरीय पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील मुलांच्या गटातून नितेश तायडे ने प्रथम, धनंजय अरदडे ने तृतीय तर मुलींच्या गटातून कु. दिव्या जाधव ने प्रथम क्रमांक पटकावला.सदर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सदर विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . त्यांच्या पुढील स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे व रेड रिबन क्लबचे संयोजक डॉ निखिल अग्रवाल परिश्रम घेत आहे.