स्व.विनोद पवार यांच्या दोन अपत्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या आ. सिद्धार्थ खरात यांनी घेतली पवार कुटुंबीयांची सात्वनपर भेट...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
स्वातंत्र्यदिनी आडोळ खुर्द येथील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान गौलखेड येथील आंदोलक विनोद मधुकर पवार यांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी घेतली. दरम्यान दिनांक २१ ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी गौलखेड येथे जाऊन स्व. विनोद पवार यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली. यावेळी आंदोलक स्व.विनोद पवार यांच्या मातोश्री, पत्नी आशाबाई, मुलगा अभय आणि मुलगी करुणा यांची आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी आस्थेने विचारपूस करून स्व. विनोद पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान विनोद पवार हे कुटुंबाचे आधार होते त्यांचे जाण्याने कुटुंब उघड्यावर आले असून त्यामुळे कुटुबाला आधार मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबातील दोन अपत्यांना जिगांव प्रकल्पातील शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात व शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.एक महिन्यापुर्वी आंदोलक व ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा, प्रकल्प अधिकारी, पोलीस स्टेशन, यांना निवेदन सुध्दा दिले होते.परंतु १५ आँगष्ट पर्यंत ही प्रकल्प ग्रस्तांच्या निवेदनावर कोणतीही ठोस कारवाई संबंधित विभागाने केली नाही.जलसमाधी आंदोलनाच्या दिवशी सुध्दा संबंधित विभागाने आंदोलकांना रस्त्यावर अडविले नाही.तसेच यावेळी आंदोलन ठिकाणी एनडीआर एफ टिम तैनात केली नाही तसेच आंदोलन विनोद पवार हे ओरडून सांगत होते की मला पोहता येत नाही तरीही त्यांनी पूर्णा नदी पात्रात उडी घेतल्यानंतर त्यांना वाचवायला कोणताही अधिकारी व संबंधित टीम या ठिकाणी नदीपात्रात गेली नाही.या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना सुध्दा देणार असल्याचे यावेळी आ.खरात यांनी सांगितले तसेच पक्षाच्या वतीने सुद्धा स्व. विनोद पवार यांच्या परिवाराला सहकार्य केल्या जाईल असे आश्वासन सुद्धा आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,तालुकाप्रमुख संतोष दांडगे, विधानसभा प्रमुख भिमराव पाटील,उपतालुकाप्रमुख विजय काळे,शहरप्रमुख रमेश ताडे, किसन मिरगे, कुणाल दळवी, पवन अहिर, योगेश मनसुटे, हरिभाऊ टापरे, गजानन टेकाडे यांचेसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मतदारसंघ अध्यक्ष विश्वासराव भालेराव पाटील, शिवाजी पाटील यांचेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
