JCI SAT Scholarship Aptitude Test 2025 – जळगाव जामोदमध्ये अभूतपूर्व यश....


 
JCI SAT Scholarship Aptitude Test 2025 – जळगाव जामोदमध्ये अभूतपूर्व यश....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी JCI जळगाव जामोद व JCI INDIA ZONE 13 यांच्या संयुक्त विद्यमाने JCI SAT Scholarship Aptitude Test 2025 चे आयोजन जळगाव जामोद येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडले. या परीक्षेत 272 स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, जळगाव जामोदच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला.प्रसेनजित मिश्रा, फाउंडर प्रेसिडेंट JCI जळगाव जामोद यांच्या पुढाकाराने हे उपक्रम केवळ यशस्वीच ठरले नाहीत, तर येत्या काळात अनेक नाविन्यपूर्ण आणि भरीव शैक्षणिक कार्यक्रमांची दिशा दाखवणारे ठरतील.परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रथमच ऑरिजनल OMR शीट पॅटर्नवर परीक्षा दिली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षेचे अनुभवसंपन्न प्रशिक्षण मिळाले.या आयोजनासाठी Guru Mauli Classes जळगाव जामोदचे अतुल ढोकणे सर यांनी संस्थेचे परिसर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे ब्रिलियंट अकॅडमीचे आमले सर, Math Classes श्याम गांधी सर, अल्फरान उर्दू हायस्कूल, तसेच JCI जळगाव जामोदची संपूर्ण टीम यांनी वेळोवेळी अमूल्य योगदान दिले.तसेच आरती पलन, देशमुख मॅडम, बिना दुबे, डॉ. सतीश शिरेकार, डॉक्टर मंगेश बडेरे, अक्षय वानखडे, किरण दादा वावटलीकर व संपूर्ण गुरु माऊली एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची टीम यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.हा उपक्रम जळगाव जामोदच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले असून, यापुढेही असेच उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post