वाघाने प्रवीण च्या शिकारी नंतर दुसऱ्या दिवशी रात्री गावात बकरीचा पडला फडशा...कुलंगणा गावात वाघाची दहशत; नागरिक भयभीत....


वाघाने प्रवीण च्या शिकारी नंतर दुसऱ्या दिवशी रात्री गावात बकरीचा पडला फडशा...कुलंगणा गावात वाघाची दहशत; नागरिक भयभीत....

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा जवळ किल्ल्याच्या पायथ्याशी कुलगणा खृर्द जंगलात चार दिवसां पूर्वी वाघाने प्रवीण नामक युवकावर हल्ला करून त्याला ठार केले होते, रात्रभर वाघ त्याच्या प्रेता जवळ बसलेला होता  दुसऱ्या दिवशी त्यांचा अंतिम विधी झाल्या नंतर रात्री दिनांक 22/8/25 रोजी तिनं वाजताच्या दरम्यान मृतक प्रवीण सुक्राम बेलसरे यांच्या भावा च्या घरात बिपट या प्राण्याने हल्ला करून एका बकरीचा पडशा पडला , रात्री गाव झोपेत अवस्थेत असताना या हिसंक प्राण्याने गावात येऊन हल्ला केल्याची घटना घडली आहे नागरिकांनी असे सांगितले की वाघाचा आवाज जोरात ऐकायला आला होता आम्ही जीव मुठीत धरून  आरडा ओरड केली तेव्हा हा बिबट पळून गेला ,मात्र तो पर्यंत बकरीचा तळपळून मृत्यू झाला होता  घटने ची माहिती जवळ च्या ,वसतापुर फॉरेस्ट ऑफिस विभागाला देण्यात आली फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी, व आर एफ ओ आलोकार मॅडम, वनपाल बाळापुरे यांनी कुलंगणा गावात जाऊन चौकशी सुरू केली आहे मात्र वाघाच्या दहशतीने आज ही गाव दहशतवादी असल्याचे मत शंकर घोरे यांनी सांगितले कुलंगणा गाव हे गाविलगड किल्ल्याच्या पायथ्याशी असुन  या ठिकाणी अनेक गावे असून परिसरात वाघाचे भीतीने नागरीक दहशतीखाली आहेत या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून होत आहे...

Previous Post Next Post