अवैध रेती वाहतूक एकाचा मृत्यू ? त्या दोन्ही वाहनावर कारवाई होणार काय .?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
💥अवैध रेती वाहतूक एकाचा मृत्यू ? त्या दोन्ही वाहनावर कारवाई होणार काय .?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सर्रास रेती तस्करी सुरू असल्याने एका केळी ने भरलेल्या वाहनाच  रेतीने भरलेल्या दोन ट्रॅक्टरच्या वाहनाने धडक दिल्याने त्यात एका मजुराजा मृत्यू झाला. परंतु सदर प्रकरणी त्या दोन्ही ट्रॅक्टर वाहनावर कोणतीही महसूल विभागाकडून कारवाई झाली नाही,त्या दोन्ही अवैध रेती वाहनावर महसूल कारवाई होणार काय ?  दंड वसुली करणार काय की प्रकरण रफा दफा करणार अशी चर्चा तालुकाभर सुरू आहे.संग्रामपूर तालुक्यात शनिवारी 23 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर येत असताना समोरून केळी वाहतूक करणाऱ्या आयशरला जबर धडक लागल्यामुळे यामध्ये आयशरमधील क्लीनरचा वाहनाखाली दबून जागीच मृत्यू झाला. ह्या प्रकरणी आयशर मालकाचे फिर्यादीनुसार एका ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये दुसऱ्या ट्रॅक्टरवर का कारवाई करण्यात आली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी तसेच संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आशीर्वादामुळे रात्री दिवसा दररोज सर्रास अवैध रेती वाहतूक होत असल्याचा आरोप मृत्यूकाच्या  नातेवाईकांनी केला होता. अद्याप पर्यंतही त्या दोन्ही वाहनावर तहसीलदारांनी महसुली कारवाई का केली नाही.  महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर एनपीडीए नुसार कारवाई करावी असे आदेश असताना का कारवाई केली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे गरीब कुटुंबातील इसमाला जीव गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे. मात्र या अपघाताने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. या गंभीर घटनेची स्वतः महसूलमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

___________________________________________

या घटनेप्रकरणी बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्याशी संपर्क साधला आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले.

Previous Post Next Post