आसलगावच्या पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ५० लेझीम भेट...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील पीएमसी जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थ्यांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपल्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश श्रीकृष्ण भेलके व त्यांचे बंधू डॉक्टर राजेश श्रीकृष्ण भेलके यांनी ५० लेझीम भेट दिल्या.. दिनांक २५ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश भेलके व त्यांचे बंधू डॉक्टर राजेश भेलके यांचा वाढदिवस धुमधडाक्यात व्यर्थ खर्च न करता या दोघे बंधूंनी पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांकरीता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ५० लेझीम भेट स्वरूपात दिल्या. यावेळी दोन्ही भावंडांचा वाढदिवस पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष भगवान टापरे यांचे सह शाळा समिती सदस्य व शिक्षक वृंद व कर्मचारी गावातील नागरीक व हायस्कूल मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.