स्कॉर्पिओच्या धडकेत दोघांचा मृत्यू; बालिका गंभीर...धारणी-हरिसाल मार्गावरील घटना...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

 पोळ्यानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने दोन लहान मुलींना दुचाकीने वर्धा येथून धारणमहूला घेऊन जात असताना स्कार्पिओने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक व एक बालिका या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसरी बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना धारणी-हरिसाल मार्गावरील कडाव फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.मुकेश भिलावेकर (३५) रा. धारणमहू व अनुष्का दुर्गादास धांडे (६) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत, तर कीर्ती रामचंद्र ठाकरे (१३) ही गंभीर जखमी झाली आहे. तिला प्रथम धारणी रुग्णालयात उपजिल्हा दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला रेफर करण्यात आले.इंदौरहून अमरावतीकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक एमपी ०९ झेड डी ००२८ ने समोरून येणाऱ्या मुकेश भिलावेकर यांच्या दुचाकी क्र. एमपी ६८ एमजे १०६० ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक मुकेश भिलावेकर व अनुष्का धांडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कर्मी ठाकरे ही गंभीर जखमी झाली. माहितीनुसार अनुष्का व कीर्ती या दोघी वर्धा येथे शिक्षण घेत होत्या. पोळा सणानिमित्त घरी येण्यासाठी नातेवाईक मुकेश भिलावेकर हे त्यांना त्यांच्या दुचाकीने वर्धावरून गावाकडे घेऊन येत होते. परतीच्या प्रवासातच धारणी-हरिसाल मार्गावरील कडाव फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. धारणी उपजिल्हा मृतदेहांचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. या घटनेने धारणमहू गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास धारणी पोलिस करीत आहेत.

Previous Post Next Post