केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिराची तालुकास्तरीय बुद्धिबळ खेळात घवघवीत यश...!
जळगाव जा.प्रतिनिधी...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा द्वारे आयोजित, जळगाव जामोद तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद चा विद्यार्थी हर्ष ऋषिकेश विप्रदास याची वयोगट 17 मध्ये बुद्धिबळ या खेळात दिनांक 25 आँगष्ट रोजी जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री किशोर केला सर व संस्थेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ स्वाती किशोर केला मॅडम तसेच सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य विनायक उमाळे सर यांनी हर्षचे पुष्पगुच्छ व शब्द सुमनांनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...