हिवरखेड येथे मोठ्या उत्साहाने बैल पोळा साजरा,दुसऱ्या दिवशी भरला तान्हा पोळा,


हिवरखेड येथे मोठ्या उत्साहाने बैल पोळा साजरा,दुसऱ्या दिवशी भरला तान्हा पोळा,

हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड चंडिका चौकात व विविध ठीक ठिकाणी बैल पोळा मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात आला, विविध ठीक ठिकाणी येत्या निवडणुकीचे स्वरूप पाहून काही राजकीय नेत्यांनी तर पोळ्यात उत्कृष्ट बैलजोडीला बक्षीस सुद्धा वितरीत केले,  मरी माता मंदिरा परिसरात चौकातील वेसेवर  ढबाले कुटुंबियांनी त्यांच्या मानाच्या बैल जोडीला चांगली  सजावट करुन पारंपरिक पद्धतीने  पूजन करुन पोहाळे गायले.

 यावेळी  शेतकऱ्यांनी आप आपले बैल हजर करून बैल पोळा भरवला चांगलाच उत्साह यावेळी पाहण्यास आला, वर्षभर राबणाऱ्या बैलांचे पोळा सणाला पूजन होते. ही या पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांत गोडवा आनंद यावेळी दिसून आला,तर बैलाचे g घरोघरी पूजन करण्यात आले, तसेच दुसऱ्या दिवशी एवढ्याच मोठ्या आनंदाने तान्हा पोळा भरला , तान्ह्या  शेतकरी पुत्रांनी  तान्हा बैल पोळा भरवला व घरोघरी जाऊन  आला रे आला नंदी बैल आला असा नारा लावला,असा आनंद चिमुकल्यान मध्ये सुद्धा दिसून आला,

Previous Post Next Post