💥जळगाव जामोद तालुक्यातील बालविवाह उघडकीस.. पतीसह तिघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम हनवतखेड येथे वयाने कमी असलेल्या तरूणीचा विवाह ती १७ वर्षे २ महिन्याची असतांनाच करण्यात आला होता.ती संध्या ९ महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर तिला सामान्य रूग्णालय खामगाव येथे प्रसुती करिता नेण्यात आले होते.याठिकाणी डॉक्टरांनी रुग्णालयात भरती करण्यासाठी ओळख पत्रांची पडताळणी केली असता गर्भवती तरुणीचे वय कमी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव ला कळविले खामगाव पोलिसांनी गर्भवती पीडित तरुणीचा जबाब घेऊन तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला वर्ग केली असून जळगाव जामोद पोलिसांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी आरोपी पती रोहित सुरलाल जमरा,सासु भुरीबाई सुरलाल जमरा व पीडित मुलीची नातेवाईक कडूबाई तेरासिंग वास्कले यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला पिडीत गर्भवती तरुण हिच्या फिर्यादीवरून कलम ६४(२)(m)६४(२)(१),३(५) भारतीय न्याय संहिता चे सहकलम ४,६,८ बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ९,१०,११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी. नागेश मोहोळ करीत आहे.