त्रिगुणी गणेश उत्सव मंडळाचे वतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबीर संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
नवयुवकांनी एक अनोखा उपक्रम राबविला आहे यामध्ये त्यांनी रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम व विविध समाजपयोगी कार्यक्रम यावर्षी गणेश उत्सव मंडळातर्फे राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश भेलके यांनी सांगितले.तसे वृक्षारोपण व रक्तदान शिबीर घेण्याबाबत मंडळाचे अध्यक्ष गोपाल खापट तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निलेश भेलके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले.तसेच रक्तदान शिबीर दिनांक ३०आँगष्ट रोजी हभप निलेश महाराज भुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबवल्याने गावकऱ्यांकडून त्रिगुणी गणेश उत्सव मंडळाचे तसेच शाखा अभियंता निलेश भेलके यांचे कौतुक करण्यात आले.याप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता विजय तिवारी, किशोर दाताळकर,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जळगाव जामोद निलेश काळे व खांडवी वर्तुळचे वनपाल व्हीबी पाथरीकर साहेब वनरक्षक अनिल बारगीर साहेब वनरक्षक निकाळजे साहेब वनरक्षक धवसे साहेब वनमजूर भगवान जामूनकर महिंद्रा तायडे, नरेश खाडपे,गणेश तराडे तसेच मंडळाचे अध्यक्ष गोपाल खापट तसेच शाळा समितीचे अध्यक्ष भगवान टापरे भाजपा जिल्हा सरचिटणी तथा भाजपची ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण भेलके विविध कार्यकारी संचालक विठ्ठल चांदणे व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.