श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा...


 
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा...

 जळगाव जामोद प्रतिनिधी...

आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत  'हर घर तिरंगा' अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विविध उपक्रम अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत 11 वी व 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर,तिरंगा,राष्ट्रध्वज,अशोकचक्र,पोस्टर,रांगोळी यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या.स्पर्धेचे मूल्यांकन प्रा.ऋषिकेश कांडलकर, रांगोळी स्पर्धेच्या संयोजिका प्रा.नीलिमा भोपळे,  प्रा.अर्चना जोशी या परीक्षकामार्फत करण्यात आले. सौंदर्य, रंगसंगती, संदेशवहन आणि स्वच्छता या निकषांवर आधारित प्रथम,द्वितीय,तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक निवडण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक बारावी वाणिज्यच्या मुक्ताई काळे व कोमल मानकर,द्वितीय क्रमांक बारावी वाणिज्यच्या कोमल नळकांडे व गौरी नळकांडे तर तृतीय क्रमांक बारावी वाणिज्यच्या स्नेहा गिऱ्हे व रेणुका ठाकरे यांनी पटकावला तर प्रोत्साहनपर क्रमांक बारावी वाणिज्याचे विद्यार्थी प्रज्वल अडकणे,सावंत सोनोने, हर्षल राठोड यांनी मिळविला  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गिरीश मायी,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे, अधीक्षक संजय गाडेकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व देशप्रेमाच्या भावना जागृत राहाव्यात म्हणून असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे महत्त्व सांगितले.यावेळी प्रा.राजीव देवकर, प्रा.विनोद झोपे, प्रा.गणेश जोशी,प्रा.विनोद बावस्कार, प्रा.रामेश्वर सायखेडे,प्रा.विनोद धर्माळ,समाधान निलजे,गजानन वानखडे व मानसी कुळकर्णी यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post