छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक ३ मध्ये शाळा समिती अध्यक्ष चांद कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
हर घर तिरंगा अभियानांतर्गत जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये दिनांक १४ ऑगस्ट रोजी शाळा समिती अध्यक्ष तथा शिवसेना उपशहर प्रमुख चांद कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा समिती अध्यक्ष चांद कुरेशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजपुजन, महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हाराअर्पण करण्यात आले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष चांद कुरेशी यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई म्हणून सोनपापडी चे वाटप करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ३ चे शिक्षक एस.आर कौलकर,ए.पी वानखडे,व्हि.डी इंगळे ,एस पी धांडे,एस पी सोळंके,सौ.के.जी सातव,सौ. व्हि.जी दाभाडे,सौ.के.बी कुमावत यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
