श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न...
जळगांव जामोद प्रतिनिधी...
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात दि.13/08/25 रोजी हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी, तर प्रमुख उपस्थिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राजीव देवकर, तसेच प्रा. रामेश्र्वर सायखेडे होते. सरस्वती माता, भारत माता पूजनाने कार्यक्रमांची सुरूवात झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन ,माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजीव देवकर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले.देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमधे 11 विद्यार्थिनी व 2 विद्यार्थी अशा एकुण 13 स्पर्धकांनी सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत स्पर्धकांचा उत्साह वृद्धिंगत केला. आणि कार्यक्रमामधे रंगत आणली. प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या दृष्टीने प्रेरित केले.कार्यक्रमाला प्रा. डॉ. निलेश निंबाळकर, प्रा . ऋषिकेश कांडलकर, प्रा. विनोद झोपे, यांनी उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाचे संचालन, आभार प्रदर्शन प्रा. विनोद बावस्कार यांनी तर स्पर्धेचे परीक्षण प्रा. रामेश्र्वर सायखेडे यांनी केले तसेच प्रा. गणेश जोशी, प्रा. निलिमा भोपळे, प्रा . धर्माळ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
