ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जळगाव जामोद येथे रक्तदान शिबिर संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
ब्रह्मकुमारीच्या पूर्व मुख्य प्रशासिका दादीप्रकाश मनी जी यांच्या 18 वी पुण्यतिथी निमित्त ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर रक्तदान शिबिराचे आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले हे आयोजन ब्रह्मकुमारी व राष्ट्रीय सेवा योजना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ताई पाटील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई ,आपल्या दवाखान्याचे डॉ. नेवे साहेब, डॉ.डाबरे साहेब, डॉ. प्रणाली देशमुख खामगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, डॉ. निलेश निंबाळकर,सेवा केंद्र संचालिका राजयोगिनी बी के जयश्री दीदी हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला दादी प्रकाशमनी जी यांना पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रीती दीदी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला आपल्या शुभेच्छा दिल्या. बीके जयश्री दीदी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले तर डॉ. उज्वलाताई पाटील यांनी समाजसेवेचे प्रतिवादन केले डॉ. प्रणाली देशमुख यांनी सुद्धा रक्त कुणाचे घ्यावे कुणी द्यावे व यामध्ये काय अडचणी असतात त्यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच ब्रह्मकुमारीज संस्थेचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सूत्रसंचालन उमाकांत ढगे व आभार शशी दीदी यांनी केले.