जामोद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर उत्साहात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
शेतकरी सर्वसामान्य नागरीक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट रोजी जामोद येथील बारी समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक जळगांव जामोद चे तहसिलदार पवन पाटील हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामोदच्या सरपंच्या सौ गंगुबाई दामधर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार भरत कीटे, पुरवठा अधिकारी सुधीर गायकवाड,मंडळ अधिकारी विजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डाँ प्राजक्ता देशमुख,डाँ नेहा पुंडकर,सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे प्रा सचिन हागे, गोपाल घाटे,यांची प्रमुख उपस्तित होती ग्रामसेवक तुळशिराम चौधरी, अरूनभाऊ पारवे, यांच्या सह विविध पक्षांचे पदाधिकारी , सर्वच कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.यावेळी जळगाव जामोद चे तहसिलदार पवन पाटील यांनी शासन आपल्या दारी आले आहे आपल्या समस्या या शिबिरात निकाली काढाव्या असे आवाहन केले.घेतले महाराजस्व शिबीरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते, यामध्ये शेतकरी कार्ड तयार करणे, केवायसी करणे, पी एम किसान, कृषी विभाग , पुरवठा विभाग सेतू विभाग, भूमी अभिलेख,, आधार नोंदणी, घरकुल अर्ज, जाँब कार्ड,आभा कार्ड ,संजय गांधी योजना निवडणूक विभाग ,आरोग्य विभाग , ,इत्यादी विभागाचे स्टॉल होते. यावेळी आरोग्य विभागाच्या डाँ प्राजक्ता देशमुख, व टिम च्या वतीने या अभियानात आरोग्य शिबीर राबवत या शिबीरात शेकडो रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच या अभियाना अंतर्गतउपस्थित मान्यवरांच्या हस्ते सातबारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे,जन्म प्रमाण पत्र ,जाँब कार्ड यासह विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले वितरित करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी विजय शिंदे ,तलाठी आदीती मुळे ,गणेश सोळंके ,राकेश चौरे ,जी.डी वाघ, कृषी सहाय्यक कृष्णा भगत,ज्ञानेश्वर शेगोकार, जि प. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल हिस्सल, सेतु व्यवस्थापक सुनिल जावळे, यांचे सह इतरही सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सेतू चालक , व लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी गौतम वाघ यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी विजय शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले