पुरातन वटेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग स्थापना व कळस समारोह...


 
पुरातन वटेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग स्थापना व कळस समारोह...

हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड.येथील बारगणपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गा बाजूला असलेल्या  उगले प्लॉट संभाजी नगरात मोठ्या उत्साहाने शिवलिंग स्थापना व कळस ध्वजारोहण सभारभ होत आहे,दि.‌१४/०८/२०२५ रोजी होम व पूजन करून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा व कळसाची स्थापना करण्यात आली.त्यापूर्वी दिनांक १३/०८/२०२५ रोजी शिवलिंगाची व कळसाची गाव प्रदक्षिणा करण्यात आली.गाव प्रदक्षिणा व प्राणप्रतिष्ठा घ्या  दिवशी गावातील भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती ठिकठिकाणी गाव प्रदक्षिणेचे स्वागत व पूजन करण्यात आले.रविवार दिनांक १७/०२०२५ रोजी महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे...

Previous Post Next Post