मोहित दामोदर यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट..!
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोहितराजे देवाभाऊ दामोदर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा आदर्श घालून दिला. बुधवार, दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी आसलगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.अल्पवयातच राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा समाजभूषण 2024 हा मानाचा पुरस्कार मिळवणारे मोहितराजे आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. वाढदिवस साजरा करण्याच्या ऐवजी ज्ञानदान करून त्यांनी खर्चाला अर्थपूर्ण वळण दिले.या उपक्रमाला माजी तालुकाध्यक्ष रतन नाईक, देवाभाऊ दामोदर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल, मा. महासचिव प्रा. विजय सातव, सामाजिक कार्यकर्ते राहुल वानखडे, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव वानखडे, विजय दामोदर, रोशन तायडे, विकी दामोदर, शुभम दामोदर तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.