भोपळे विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद भोपळे हे होते. यावेळी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अनिलकुमार भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, साधनाताई भोपळे, उपाध्यक्ष सुनील राऊत, संचालक वीरेंद्र भोपळे, शिवशंकर मार्के, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्रा. कौस्तुभ भोपळे यांच्यासह गावातील मान्यवर, पालकगण उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी यथोचित भाषणे, देशभक्तीपर गीत, कवायती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. डॉ.भोपळे यांच्या वतीने संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी या शुभपर्वावर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे व संस्थेच्या आजीवन सदस्या स्व.कमलिनीताई भोपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आजी- आजोबा खेलरत्न पुरस्कार,क्रीडा शिष्यवृत्ती,स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका,अश्या विद्यार्थिहितोपयोगी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी केले. सूत्रसंचालन मयूर लहाने व शंकर दुनघव यांनी केले. शाळेचे पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या नेतृत्वात शिक्षक-शिक्षिका व कर्मचारीवृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
