मोहम्मद यासीन यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप...
प्रशांत भोपळे/प्रतिनिधी हिवरखेड....
हिवरखेड येथील एकता फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असणारे आणि विविध विषयांवर तथा प्रत्येक चांगल्या उपक्रमामध्ये आपले नेहमी योगदान देणारे मोहम्मद यासीन यांच्या वतीने आज मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन हेच विद्यार्थी उद्याच्या भारताचे उद्याच्या गावाचे भविष्य आहेत म्हणून आपला वेळ आणि आपला खर्च हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी लागला पाहिजे या गोष्टीला महत्त्व देऊन मोहम्मद यासीन यांनी तब्बल 151 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे म्हणजेच पेन लेटर बुक आणि इतर काही साहित्याचे वाटप करून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला.कार्यक्रमाला यावेळी शेकडो विद्यार्थी तसेच पालकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काशिफ अली शोएब अली मिरसाहेब, प्रमुख उपस्थिती आसिफ अली मिरसाहेब, मेहफुज अली मीरसाहेब, आरिफ अली मिरसाहेब, डॉ शकील अली मिरसाहेब मोहम्मद तौफीक ठेकेदार, जाहीर खान पठान, सादिक खान पठान, इसराइल खा, मोहम्मद साकीब ठेकेदार, जाहिर इनामदार नाजिम खान, अहमद खान ,अजहर शेख,नदिम खान, जुनेद खान,फाहिमोद्दिन मोहम्मद तौहिद हमीद खान आमिर खान शेकडो जणांची उपस्थिति होती.
