निवडणुकांमध्ये मतांची चोरी लोकशाही वाचविण्यासाठी जळगावात काँग्रेसचे निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह देशातील इतर निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचे अनेक पुरावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहेत. यामुळे एकंदरीत देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन.यातून लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे.काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार याद्यांची मागणी केली आहे, त्या मागणीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी होत आहे.केंद्रिय निवडणूक आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत तसेच विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांची उच्चस्तरीय समिती नेमुन निवडणूकांत होत असलेल्या मतांची चोरी प्रकरणी चौकशी ची मागणी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन भारताचे राष्ट्रपती तसेच अध्यक्ष निवडणूक आयोगाला उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांचे मार्फत दिले आहे . निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ज्योतीताई ढोकणे, अविनाश उमरकर,अॕड.भालेराव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी जळगाव जामोद, डॉ संदीप वाकेकर, ओ पी तायडे, एडवोकेट काकडे, एडवोकेट अमर पाचपोर, अजहर देशमुख, प्रवीण भोपळे, अयाज पुनेवाले, हुसेन राही, सुरेश वानखडे, अनिल इंगळे ,कलीम मेंबर ,सुनील काकडे, प्रमोद तितरे, तुकाराम गटमने , शमूभाई जहागीरदार, संभाजी निर्मळ, बाबन वाघ, सय्यद अफरोज, अजीम पटेल,एकनाथ सोनाग्रे, गणेश घ्यार, मनोहर मानकर, शालिग्राम खराटे,संतोष खांजोडे, हरिदास मोरखडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.