विकासपुरुष आमदार डॉ_कुटे_साहेबांच्या_कर्तृत्वाने_जळगाव_चमकलं_सर्वत्र..


--संपादकीय --

♦️विकासपुरुष आमदार डॉ_कुटे_साहेबांच्या_कर्तृत्वाने_जळगाव_चमकलं_सर्वत्र..

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत बसलेला जळगाव विधानसभा मतदार संघ . जो पूर्वी जलंब विधानसभा मतदारसंघ या नावाने होता . आता गत दहा वर्षात , या जळगाव जा. विधानसभा मतदारसंघात जी काही नेत्र दीपक कामगिरी झाली . ती केवळ आमदार - माजी मंत्री डॉ . कुटे साहेब यांच्या सतर्क कर्तव्य तत्परते मुळेच . एक साधारण सामान्य शेतकरी परिवारातून असलेले हे विद्यमान आमदार साहेब , ज्यांचे कडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती . तरी सुद्धा यांनी यांच्या राजकीय कारकीर्दीत दोन आमदारकीच्या कालावधीत , यांनी पूर्ण मतदार संघात शक्य तितके विकास कामे पूर्णत्वास नेली . इतर परिसरातील दुसऱ्या मतदारसंघातील घोषणाबाजी व जाहिरात बाजी करणाऱ्या आमदारां पेक्षा कुटे साहेबांचे कार्य म्हणजे खरोखरच " सर्वेपि सुखीनः संतु " व एकंदरच असलेल्या स्वतःच्या पदाला न्याय मिळवून देणे . हाच जणू त्यांच्या राजकीय जीवनातील त्यांनी चालवलेला वसा , अत्यंत कौतुकास्पद व वाखाणण्या जोगा आहे . असेच म्हणावे लागेल .

      जळगाव जा. फार जुना तालुका . तसेच महसूलच्या उपविभागाचे मुख्यालय असलेले गाव आहे . परंतु कुटे साहेबांच्या अगोदर होऊन गेलेले बहुतेक आमदार , जणू फक्त राजकारण करणे व पुढील पाच वर्षा नंतर निवडणूक जिंकण्या करिता फोडाफोडीचे राजकारण करून जिंकून येण्या इतपत मतांची गोळा बेरीज करून ठेवणे . बस या पेक्षा त्यांच्या कारकीर्दीत दुसरे काही घडत नव्हते . महसूल चा उपविभाग असलेले व नगर परिषदेचे हे गाव अगदी आदिवासी पाड्यातील वस्ती सदृश्य दिसत होते . परंतु कुटे साहेबांनी या शहराचा त्यांच्या कल्पक दृष्टीतून चेहरा मोहराच बदलून टाकला ! अगदी २५ वर्षा पासून संपर्क नसलेला व्यक्ति जर आता जळगाव शहरात आला . तर त्या व्यक्तीला , हे जळगावच आहे ना !? असा आश्चर्यचकित करणारा प्रश्न पडावा . इतके यांनी जळगाव जा. शहर आखीव रेखीव पद्धतीने विकसित केलेले आहे . भूमिगत नाल्या , रस्त्यांचे रुंदीकरण , डिव्हायडर सह मध्ये स्ट्रीट लाईट , भाजीसाथी चे अगदी नियोजन बध्द रेखीव पद्धतीने त्यांना जागा उपलब्ध करून देणे . इतकेच नाही तर सर्व विक्रेत्यांना तिथेच बसण्यास त्यांचे मन वळून भाग पाडणे . ही कला सुद्धा कुटे साहेबांनाच मिळाली आहे . परिसरातील इतर मतदार संघातील नेत्यांना अजूनही साधे भाजी बाजाराला योग्य असे स्वरूप देता आलेले नाही . त्या मुळे परिसरातील मलकापूर - नांदुरा - खामगाव येथे मनात वाटेल तेथे भाजी फळ विक्रेते भाजीचे दुकाने लावून बसतात .

      माननीय आमदार कुटे साहेबांचा विकास कार्याचा झंझावात अविरत चालूच असतो . त्यांनी आता पर्यंत केलेली विकास कामे ; १४० गाव पाणी पुरवठा योजने द्वारे प्रत्येक घराघरात वारी चं शुद्ध आणि चवदार पाणी पुरवणारा ह्या माणसाला जनता जल योद्धा म्हणते ते काही उगीच नव्हे . प्रशासकीय पातळीवर अखंड पाठपुरावा करून ही योजना भाऊंनी कार्यान्वित केली . अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील एकमेव पाणीपुरवठा योजना आहे . जी ग्रामीण भागाची संघटित जल आपूर्ति करते . योजनांच्या बाबत भाऊच्या स्वभावातील एक पैलू म्हणजे , असलेल्या राज्य शासनाच्या योजने मध्ये जर काही उचित बदल कुणी सामान्य माणसाने - कर्मचाऱ्याने सुचवला , तर तो अभ्यास पुर्वक स्विकारतात . ज्या मुळे ती राज्य सरकारची योजना अधिक प्रभावाने सामान्य जणां साठी अधिक उपयुक्त ठरते . म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीने जरी काही बदल सुचवले , तरी भाऊ त्या कडून सविस्तर माहिती ऐकून घेऊन सभागृहात त्या विषयी बाजू मांडून राज्य शासनाच्या त्या योजनेत तसे बदल करून घेणे . हे सुद्धा मोठ्या मनाने भाऊ स्वीकारतात .

      तसेच भाऊंचे परिवारातून , " कुटे गुरुजी फॉउंडेशन " माध्यमातून ' मोतीबिंदू मुक्त मतदार संघ आणि कुपोषण मुक्त मतदार संघ ' साठी जे प्रयत्न चालू आहेत . हे सेवा कार्य या परिसरा खूप मोठा आदर्श ठरत आहे . तसेच आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्या साठी जे प्रयत्न आमदार संजूभाऊ सातत्याने करतात , या मुळे ते खरोखर कर्मयोध्दा नावाला पात्र होतात . विकास म्हणजे केवळ मोठ-मोठी बांधकामे नसतात . तर लोकांचं आरोग्य , शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न सोडवून , त्यांना सक्षम करणे हा पण मोठा विकास असतो . भाऊंनी ते बरोबर ओळखलंय. अनेक लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून , कित्येक हेक्टर शेती आज पाण्या खाली आलेली आहे . याची साक्ष या मतदार संघात फुललेल्या संत्री, सीताफळ आणि केळीच्या बागा देत आहेत .इतर मोठ मोठ्या शहरांच्या व विकसित जिल्हें च्या तुलनेत पाहता , जळगांव सारख्या ग्रामीण व आदिवासी वस्ती भागात एक सरकारी मेडिकल कॉलेज असावं म्हणून भाऊंची अखंड धडपड सुरु आहे . तेही नुकतच मंजूर झाल्याचे कळते . केवळ कॉलेजातील मुलींच्या रस्ता सुरक्षितते करिता संजू भाऊंनी बस स्टॅन्ड ते न्यू ईरा कॉलेज परिसरातील शाळा-कॉलेजच्या रस्त्या पर्यंत ओव्हर ब्रिज फक्त मुलीं साठी तयार करणे सुरू केले आहे . इतक्या बारीक चिंतनांचे व संवेदनशील मनाचे जिल्ह्यातील हे एकमेव आमदार असावेत . बुलढाणा जिल्ह्यात असलेले एकूण आमदारकीच्या क्षेत्रां पैकी कधी काळी सर्वात पिछाडीवर असलेला जळगाव हा मतदार संघ , आता मात्र जिल्ह्यात सर्वात वरच्या क्रमांकावर जाण्या साठी खऱ्या अर्थाने कारणीभूत आमदार संजू भाऊ कुटे यांना श्रेय जाईल . भाऊंना जल योद्धा ,आरोग्य योद्धा , कर्म योद्धा , सर्वांगीण विकास योद्धा इत्यादी अशा आणखी उपाध्यांनी गौरवित करणे अतिशयोक्ति ठरणार नाही . त्यांनी जळगावात ब्राह्मण समाज सभागृह व प्रत्येक गावात मागणी प्रमाणे प्रार्थना स्थळांचे नूतनीकरण साठी निधी पुरवणे अव्याहत चालू ठेवले आहे . अखंड अविरत संपूर्ण मतदार संघाचा ध्यास घेतलेला हा माणूस , मात्र अजूनही सामान्यां मध्ये मिसळताना स्वतः कोणी एक आमदार किंवा स्वतःला प्रतिष्ठित समजणे , या अविर्भावात केव्हाही पाहायला मिळत नाही . अगदी सामान्य व्यक्ति म्हणून जळगाव शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता , या नात्यानेच या माणसाचा सहज व साधेपणातून वावर चालू असतो . हे आणखीच विशेष ! संजू भाऊंनी जर मनावर घेतले . तर कदाचित नांदुरा ते जळगाव जामोद रेल्वे लाईन सुद्धा ते मतदार संघा साठी उपलब्ध करून देऊ शकतील . इतकी या माणसाची विकासाची धडपड कदाचित नजीकच्या भविष्य काळात सुद्धा पाहायला मिळू शकते...!

जय महाराष्ट्र - जय हिंद .

अशोकराव घनोकार , नांदुरा .

९७६३०५५०७१

Previous Post Next Post