शेगाव येथील नमो मॅरेथॉन स्पर्धेत 250 स्पर्धेकांचा सहभाग.आ डॉ.संजय कुटेही अनवाणी धावले....


 
शेगाव येथील नमो मॅरेथॉन स्पर्धेत 250 स्पर्धेकांचा सहभाग.आ डॉ.संजय कुटेही अनवाणी धावले....

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

सेवा पंधरवड्यानिमित्त भाजप युवा मोर्चा शेगाव शहर व तालुका शाखेच्या वतीने "नमो मॅरेथॉन" या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.250 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्ड येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाले.या मॅरेथॉनमध्ये शेगाव शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच प्रौढापर्यत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पहाटेपासूनच धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली.यावेळी आपल्या मनोगतात आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले भारतामध्ये नशा मुक्तीची चळवळ जोमाने राबवली पाहिजे. युवक हेच देशाचे भवितव्य आहेत. नशामुक्त भारतच समृद्ध भारत व सुदृढ भारत घडवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना व प्रेरणेने प्रत्येक युवक-युवतीने निरोगी, शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक होण्याची गरज आहे. 'नमो मॅरेथॉन' ही स्पर्धा म्हणजे केवळ धावण्याची स्पर्धा नसून आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याचे प्रतीक आहे.असे ते म्हणाले.कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष शरदसेठअग्रवाल,पुरूषोत्तम शेगोकार,प्रदीप सांगळे,राजेंद्र शेगोकार, संजय कलोरे,शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,सचिन ढमाळ,सौ अंजलीताई जोशी,तालुकाध्यक्ष राजेंद्र ढोले,रूपाली बरडे,राजेश अग्रवाल, कल्पना मसने,चेतना खेते,दिपक ढमाळ,पवन शर्मा,कमलाकर चव्हाण,मंगेश फुसे,राजेंद्र हेलगे,रविंद्र उन्हाळे,संतोष चौखंडे,विजय यादव ,विजय बोराडे आदीसह ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेत पुरूष गटातून  प्रथम मंगेश साबे,  द्वितीय शुभम मुलांडे,तृतीय यश पांडे तर मुलींमधून प्रथम ईश्वरी लभाणे,द्वितीय विजया कंठाळे, तृतीय अंजली डांगे विजयी झाले.तसेच स्परधेत सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहन पर ठाणेदार नितीन पाटील,संतोषबापू देशमुख, राजेंद्र देवचे  यांचाही सन्मान करण्यात आला.संचलन डाॅ मोहन बानोले व किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विजय भालतडक यांनी केले. शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी आभार मानले.भाजपा पदाधिकारीही धावले...संतोष देशमुख, राजेंद्र देवचे,विनायक भारंबे,अनिल उंबरकर हे स्पर्धेत स्पर्धेक म्हणून सहभागी झाले होते.

Previous Post Next Post