नमो मॅरेथॉनमध्ये महिला आघाडीचे उत्कृष्ट नियोजन – मुलींचा उल्लेखनीय सहभाग...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्या अंतर्गत आयोजित नमो मॅरेथॉन स्पर्धा शेगावात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला शहर व तालुक्यातील नागरिक, युवक-युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे भाजप महिला आघाडीच्या पुढाकारामुळे मुलींचा सहभाग विशेषत्वाने लक्षणीय ठरला.शहर अध्यक्ष अंजली जोशी व तालुकाध्यक्ष रूपाली बरडे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मॅरेथॉनचे संपूर्ण नियोजन अत्यंत सुयोग्यरीत्या पार पाडले गेले. नोंदणी, मार्गदर्शन, सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच मुलींसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर उपक्रम अशा सर्व अंगांवर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले.मुलींचा सहभाग वाढावा यासाठी सौ. रूपाली बरडे यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी गटनेते नेमून स्पर्धेत सामील होण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे नमो मॅरेथॉन मध्ये उत्साहाने सहभागी झाली.स्पर्धेदरम्यान मुलींनी दाखवलेली क्रीडाभावना, शिस्त आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. “आरोग्यदायी जीवनशैली, नशामुक्त भारत आणि महिला सबलीकरण” या संदेशाला या मॅरेथॉनद्वारे भक्कम प्रतिसाद मिळाला.अंजली जोशी म्हणाल्या – “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून देशभर साजरा होत आहे. या उपक्रमात शेगावातील मुलींनी इतक्या मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ही अभिमानाची बाब आहे. भविष्यातही महिला आघाडी अशा उपक्रमांत अग्रणी भूमिका बजावेल.”तर तालुकाध्यक्ष रूपाली बरडे यांनी मनोगतात सांगितले – “महिला सबलीकरणाचे खरे रूप म्हणजे त्यांचा सर्व क्षेत्रात सक्रिय सहभाग. क्रीडा व आरोग्यदायी उपक्रमांमधील सहभाग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या मॅरेथॉनमुळे मुलींना आत्मविश्वास मिळाला आहे. महिला आघाडी नेहमीच अशा सकारात्मक उपक्रमांचे नेतृत्व करेल.”
शहरातील ज्येष्ठ नागरिक, पालक आणि शिक्षकांनी महिला आघाडीच्या या नियोजनाचे कौतुक केले. मुलींनी क्रीडा आणि सामाजिक संदेश यातून एक नवीन आदर्श उभा केला. शेगावमध्ये आयोजित नमो मॅरेथॉन महिला आघाडीच्या योगदानामुळे अधिक भव्य, यशस्वी आणि संस्मरणीय ठरली.भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव कल्पना मसने शहराध्यक्ष अंजली जोशी शेगाव तालुका अध्यक्ष रूपाली बर्डे यांचे नेतृत्वात चेतना खेते, चंदा ददगाळ, संगीता आखरे, योगिता बोरकर,सुवर्णा लहाने,श्वेता पांडे,आरती वैद्य,अंजली देशपांडे आणि अंजली पांडे,प्रणिता कलोरे,जया सिंनगारे अर्चना बाठे,प्रीती तिवारी,सुमित्रा शर्मा आदीसह अन्य महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.