जामोद येथे भव्य गरबा इव्हेंट संपन्न...स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते, तर ती संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते - मिनल दामधर..
जामोद प्रतिनिधी प्रतिनिधी....
दिनांक २० सप्टेंबर रोजी जामोद येथे मिनलताई समाधान दामधर यांनी आयोजित केलेला मोफत गरबा इव्हेंट संपन्न झाला. सदर गरबा इव्हेंट मध्ये ७०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या. गरबा इव्हेंट मध्ये गरबा क्वीन म्हणून दुर्गा मिसाळ यांनी बहुमान मिळवला तर प्रथम बक्षीस पुजा धुर्डे यांना, द्वितीय बक्षीस कीर्ती तेलंग्रे यांना , तृतीय बक्षीस प्रांजल धर्मे यांनी पटकावले . याव्यतिरिक्त गरबा इव्हेंट मध्ये प्रोत्साहन म्हणून २० महिलांना विविध गिफ्ट देण्यात आले.गरबा इव्हेंट पूर्वी चार दिवसीय मोफत गरबा वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. सदर वर्कशॉप मध्ये ट्रेनर माधुरी दातीर यांनी चार दिवस ट्रेनिंग देऊन महिलांना इव्हेंट करिता तयार केले.
दररोज १५० पेक्षा अधिक महिलांनी गरबा चे ट्रेनिंग घेतले."स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते, तर ती संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते असे मत मीनल दामधर यांनी व्यक्त केले व स्त्री हाच खरा ग्राम विकासाचा आत्मा असल्याचे सांगितले.यावेळी बोलतांना आरती पलन यांनी जामोद येथे पहिल्याच वर्षी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व भव्य आयोजन आश्चर्यचकित करणारे होते असे मत व्यक्त केले, तर जयश्री सौदागर यांनी बोलतांना मीनल दामधर ह्या ग्रामीण महिलांना दिशादर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला.गरबा इव्हेंट च्या अध्यक्ष स्थानी जामोद गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच गंगुबाई दामधर तर निरिक्षक म्हणून साईमंगल गरमेंट, जळगांव च्या संचालिका जयश्री सौदागर, गरबा ट्रेनिंग सेंटर च्या संचालिका आरती पलन, रजनी मेक ओव्हर पार्लर, च्या संचालिका रजनी प्रतिक हिस्सल, कल्पतरू ड्रेसेस च्या संचालिका आशा ताडे, इव्हेंट च्या आयोजक मीनल समाधान दामधर होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन माधुरी दातीर यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन मीनल दामधर यांनी केले.कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत चार दिवसीय वर्कशॉप व भव्य गरबा इव्हेंट चे आयोजन बाबत संपूर्ण परिसरात मीनलताई दामधर यांचे कौतुक होत आहे.