जिल्हयातील 4 मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस… नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश...


 
जिल्हयातील 4 मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस… नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

21 सष्टेबरच्या  रात्री व 22 सष्टेबरच्या सकळी  बुलढाणा जिल्हयातील 4 मंडळ क्षेत्रामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे या मंडळ क्षेत्रामध्ये घरांचे आणि शेतजमिनीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी ,   सिदखेडराजा सोनाशी  आणि  तुळजापूर  या चार मंडळांतर्गत 21 सप्टेंबरच्या रात्री व 22 सप्टेंबर च्या सकाळी  ढगफुटीसदृश्य  पाऊस झाला. या पावसामुळे नदि नाले तुडूंब भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक कुटूंबांच्या घरांचे व घरातील सामानांचे नुकसान झाले आहे. तर शेतजमिनही खरडुन गेले आहे. जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पाडळी मंडळामध्ये 121.3 मी मी पाऊस झाला देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर मंडळ अंतर्गत 65.8 मि मी पाऊस झाला आहे  सिदखेडराजा मंडळात 65.8 आणि सोनोशी  मंडळ अंतर्गत 175.3  पावसाची नोंद  झाली आहे. त्यामुळे या मंडळ क्षेत्रामध्ये शेतजमिनीचे आणि घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतजमिनीचे कृषी विभाग, महसुल विभाग आणि पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधी समवेत तात्काळ पंचनामे करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरुन संबधित विभागांना निर्देशित कराव्यात  अशा सुचना जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहे.

Previous Post Next Post