तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ जळगांव जामोद च्या वतीने डॉ. आंबेडकर विद्यालयात कायदेविषयक जनजागृती...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
डॉ आंबेडकर विद्यालय जळगांव जामोद येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक दिनांक २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटी जळगांव जामोद चे सचिव आणी जेष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट एस वाय खिरोडकर साहेब, प्रमुख पाहुणे आणी मार्गदर्शक प्रथम वर्ग दिवाणी व फौंजदारी न्यायधीश मेंढे मॅडम, आणी वकील संघ जळगांव जामोद चे अध्यक्ष ॲडवोकेट मो. इरफान मो. तफज्जूल जमदार, कार्यकारी अध्यक्ष ॲडवोकेट डी जे खेर्डेकर, सचिव ॲडवोकेट आनंद जोशी, आणी सदस्य वकील संघ जळगांव जामोद चे ॲडवोकेट एस एस बावणे, ॲडवोकेट निशा वानखडे, ॲडवोकेट कल्पना डोंगरदिवे, ॲडवोकेट प्रियंका करांगळे इत्यादी मंडळी उपस्थित होते कार्यकक्रमाची सुरवात ॲडवोकेट एस एस बावणे यांच्या संविधानावर कविता सादर करून झाली. ॲडवोकेटमो.इरफान जमदार यांनी संविधान, ॲडवोकेट खेर्डेकर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तर ॲडवोकेट आनंद जोशी यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते न्यायधीश मेंढे मॅडम यांनी शालेय विद्यार्थी आणी विद्यार्थिनी सोबत अतिशय कौटुंबिक वातावरणात पोक्सो या कायद्यावर चर्चा केली मुलांना गुड टच, बॅड टच, मोबाईल चा वापर, विपरीत परिस्थितीत कसे वागावे, तक्रार कोणाकडे, कधी करावी, संकटकाळी कसे वागावे अश्या मौल्यवान सूचना देखील केल्या.कार्यक्रमाचे संचालन के ओ इंगळे सर, स्वागत पर्यवेक्षक रुपाली आमले, आभार प्रदर्शन मुख्यध्यापक डी व्ही इंगळे सर यांनी केले...