महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बनची निर्मिती ...! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 5 सष्टेबरला होणार उद्घाटन.!


 
महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून  राजलक्ष्मी अर्बनची निर्मिती ...! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 5 सष्टेबरला होणार  उद्घाटन.!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन सोहळा 5 सप्टेंबरला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे ...भारतात स्वयंरोजगार महिला संघटनाच्या माध्यमातून 1970 च्या दशकात बचत गट कार्य सुरू झाले  बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्वावलंबन निर्माण करून त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे बुलढाण्यात एम्पायर महिला बचत गटातील महिलांनी जमा  झालेल्या ठेव संचय  संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे या महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा 5 सप्टेंबरला   केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार ) आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ,बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड   ,बुलढाणा अर्बनेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक हे प्रमुख मार्गदर्शक तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आमदार धीरज लिंगाडे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे माजी आमदार घृपतराव सावळे शेतकरी नेते रविकांत तुपकर उबाठा शिवसेनेच्या  प्रवक्त्या जयश्री शेळके जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघाचे अध्यक्ष विजय टेकाळे  जिल्हा उपनिबंधक डॉ महेंद्र चव्हाण तालुका निबंधक गजानन आमले उपस्थित राहणार आहेत  बचत गटाच्या ठेव संचयातून  निर्मित झालेल्या या महिला पतसंस्थेच्या कार्यक्रमाला महिलांनी आणि नागरिकांनीही उपस्थित रहावे असे आवाहन राजलक्ष्मी महिला अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आले...

Previous Post Next Post