गणेश विसर्जन स्थळावरील सुविधांचा तहसीलदार पवन पाटील ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी घेतला आढावा...


 
गणेश विसर्जन स्थळावरील सुविधांचा तहसीलदार पवन पाटील ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी घेतला आढावा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

गणेश विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर दिनांक ४ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुका दंडाधिकारी पवन पाटील तसेच पोलीस स्टेशन ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी मानेगांव पुर्णा नदीचे पुलावर तसेच जळगाव जामोद शहर व सुनगाव जामोद येथील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात सातपुड्यातील लघु प्रकल्प गोराळा धरण येथे गणरायाचे विसर्जन करत असतात या ठिकाणांवर जाऊन गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विसर्जन स्थळाची पाहणी व गणेश विसर्जन करतेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून याठिकाणी नियोजन करण्यात आले. तसेच या दोन्ही विसर्ज स्थळांची साफसफाई व या ठिकाणी विद्युत रोषणाई चा तहसीलदार पवन पाटील व ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी आढावा घेतला.तसेच गणरायाचे विसर्जन करतेवेळी होणारी गर्दी पाहता पूर्णा नदी पूल तसेच गोराळा धरण या विसर्जन स्थळी कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासंदर्भात तहसीलदार पवन पाटील यांनी ठाणेदार श्रीकांत निचळ यांना विसर्जन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सुचना केल्या.


गणेश विसर्जन स्थळाच्या पाहणीसाठी तहसीलदार पवन पाटील, ठाणेदार श्रीकांत निचळ, पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे, नायब तहसीलदार भरत किटे,गुप्तचर विभागाचे पो.हे.काँ. निलेश पुंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन गजानन मानकर,स्थानिक पोलीस पाटील, तेथील बीट जमदार, आपत्ती विभागाचे कर्मचारी सफाई कामगार यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post