आदिवासी भागात सुविधांचा अभाव.. आदिवासी भागातील सुविधांची पूर्तता न झाल्यास शिवसेनेचा अर्ध नग्न आंदोलनाचा इशारा...


 
आदिवासी भागात सुविधांचा अभाव.. आदिवासी भागातील सुविधांची  पूर्तता न झाल्यास शिवसेनेचा अर्ध नग्न आंदोलनाचा इशारा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

गेल्या काही दिवसा अगोदर आर सी २४ न्यूज ने  राजुरा बुद्रुक येथील रस्त्याच्या समस्यांसह गावकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्या बातमीची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक ३ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या राजुरा बुद्रुक येथील आदिवासी गावांमध्ये नागरी वस्तीत रस्ते नाल्या गटारी तसेच येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून त्या ठिकाणी सुद्धा मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मुलांना हातपंपाचे दूषित पाणी प्यावे लागते तसेच येथील नागरिकही हेच पाणी पितात तसेच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे रसलपूर ग्रामपंचायत च्या अंतर्गत गोरगरीब लोकांना शासनाकडून घरकुल मिळालेले असून या गोरगरीब आदिवासींना पंचायत समिती मार्फत सोडलेले दलाल आर्थिक फटका देत आहेत. राजुरा बुद्रुक येथील शाळेमध्ये वॉटर प्युरिफायर बसून, रस्त्याची कामे लवकरात लवकर सुरू करा तसेच गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने देण्यात आले. निवेदनावरील मागण्या ३ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण न झाल्यास चार ऑक्टोबर रोजी शिवसैनिक पंचायत समिती समोर अर्धा नग्न आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ, शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाईजान, जळगाव जामोद तालुका प्रमुख संतोष दांडगे, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, उप शहरप्रमुख शेख चांद कुरेशी,सुभाष माने, विशाल पाटील, मोहम्मद फारूक, अबिद तडवी, आसिफ तडवी, गुलशेर तडवी, तुळशीराम कुमारीया यांच्यासह रसूलपुर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Previous Post Next Post