62 वर्षीय इसमाचा 15 वर्षीय बालिकेवर अत्याचार...अत्याचारातून बालिकेने दिला बाळाला जन्म...


 
62 वर्षीय इसमाचा 15 वर्षीय बालिकेवर अत्याचार...अत्याचारातून बालिकेने दिला बाळाला जन्म...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ६२ वर्षीय अशोक मालवीय या नराधमाने आपल्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामधून पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. या प्रकारामुळे आरोपी इसमाविरूध्द परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.अशोक मालवीय (६२) या इसमाविरूध्द गावकरी आक्रमक झाले असून त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक मालवीयविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायदा तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस उपविभागीय अधिकारी स्वतः तपास करत आहेत. आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे.पीडित मुलगी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली असून तिची मानसिक अवस्था ढासळली असल्याचे समजते. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Previous Post Next Post