स्व.राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत तीन लाख रुपये सानुग्रह निधीचा पालकांना लाभ...


 
स्व.राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत तीन लाख रुपये सानुग्रह निधीचा पालकांना लाभ...

प्रशांत भोपळे/हिवरखेड....

हिवरखेड येथील नामांकित सहदेवराव भोपळे विद्यालयातील स्व.अनिकेत संजय मरोदे व स्व.रेश्मा रविन गोटे या विद्यार्थ्यांचा अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाला.अनिकेत मरोदे यांचा वारी येथील पाण्याच्या डोहात तर रेश्मा गोटे हीचा तिच्या राहत्या घरी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती. याबाबत महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे व समस्त पदाधिकारी, संचालकगण यांच्या मार्गदर्शनातून शाळा स्तरावरून स्व.राजीव गांधी अपघात विमा सानुग्रह योजनेचा पालकांना लाभ मिळावा याकरिता शासन स्तरावरील शिक्षण विभाग( योजना) येथे सदर योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये निधीचा लाभ मृत्युमुखी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या पालकांना लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती जबाबदारी व पाठपुरावा केल्याबद्दल भोपळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षक व कर्मचारी, प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे,माजी केंद्रप्रमुख प्रकाश राऊत यांच्याबद्दल  संस्थेच्या वतीने संस्था कार्यवाह श्यामशील भोपळे व ज्येष्ठ संचालक प्रकाश खोब्रागडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी प्रमुख उपस्थितीत उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक आरिफ शेख,विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत, लाभार्थी पालक संजय मरोदे,रविन गोटे,दयाराम कासोटे, प्रा.शंकर दुनघव, प्रा.मयूर लहाने,प्रा.गणेश भोपळे व प्रफुल भगत हे उपस्थित होते.

Previous Post Next Post