पालिकेच्या निर्माल्य कलश, कृत्रिम तलावात आ.डाँ.संजय कुटे यांनी केले श्री.गणरायाचे विसर्जन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी आपल्या संकल्पनेतून श्री गणेश मूर्तींचे सुरक्षित विसर्जन करण्यासाठी शहरातील नागरिकांना गणरायाचे विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी व जलप्रदूषणाला आळा बसावा या उदांत उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयाच्या आवारामध्ये निर्मला कलश व कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून, आज 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन होत आहे.
नागरीकांनी श्री गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी सर्व नगरवासियांना केले होते.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव जामोद मतदारसंघांचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या घरी स्थापन केलेल्या श्री गणरायाचे विधीवत पुजा व आरती करून नगर परिषदेच्या कृत्रिम तलावात श्री गणरायाचे विसर्जन केले.