संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत अपंगांना सायकल आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्याहस्ते वाटप..!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅटरिंग साहित्याचे वितरण हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. महिलांनी बचत गटांनी आपला व्यवसाय उभा करावा, स्वयंपूर्ण व्हावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे.असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय कुटे यांनी अपंगांना सायकल व प्रमाणपत्र आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वाटप करतांना केले.संग्रामपूर पंचायत समिती सेस फंड योजना तथा उमेद अभियान अंतर्गत आणि मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 30 ऑगस्ट रोजी वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांच्याहस्ते mscit विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र,अपंगांना सायकल व प्रमाणपत्र, महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण करण्यात आले.संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय कार्यशाळेचे कार्यक्रम आयोजित करण्यात होता. ह्यावेळी संग्रामपूरचे बिडीओ माधव पायघन,तहसीलदार प्रशांत पाटील,नायब तहसिलदार शिंदे, आणि पंचायत समितीचे इतर विभागाचे आधिकारी,कर्मचारी ,विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक, तलाठी,बचत गटाच्या महिला,व विविध वस्तू वाट करणारे लाभार्थी,आणि पदाधिकारी,कार्यकर्ते ,इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
