शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी...सन २०२४ - २५ खरीप हंगामातील १२७ कोटी ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४ -२५ खरीप हंगामाकरीता बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांना १२७ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली असुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.प्रधानमंत्री पीक विमा जिल्हयातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासुन वंचीत राहले होते. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिग चव्हान यांच्यासोबत चर्चा केली पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पीक विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहीजे. असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ६,२८,८०,५१,५३,९४२.९१ (सहाशे अठ्ठावीस कोटी, ऐंशी लाख, एकावन्न हजार, पाचशे त्रेचाळीस रुपये) इतकी नुकसान भरपाई मंजूर (एकूण ४,७६,३९२ शेतकऱ्यांना मंजुर आहे .या मदतीपैकी, ₹३,३०,५४,८३,९२५.८० (तीनशे तीस कोटी, चोपन्न लाख, त्र्याऐंशी हजार, नऊशे पंचवीस रुपये) इतकी रक्कम यापूर्वीच २,२८,६३६ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे.सप्टेंबर २०२५ मध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई १,२७,५०,२३,६८०.८२ (एकशे सत्तावीस कोटी, पन्नास लाख, तेवीस हजार, सहाशे ऐंशी रुपये मंजुर झाली आहे या मध्ये जिल्हयातील ८९,६२९ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.तालुकानिहाय वितरित होणारी पिक विम्याची मदत याप्रमाणे आहे.चिखली तालुक्यातील २,५११० शेतकऱ्यांना ३७,१७,५९,८५६.८६ इतकी सर्वाधिक रक्कम मंजूर झाली आहे. मेहकर तालुक्यातील २०,५८१ शेतकऱ्यांना २५,८८,३८,०८८.१५ इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील ९,५१० शेतकऱ्यांना १७,३४,९०,९९५.५५ रुपये मंजूर झाले आहेत. खामगांव: ३,९४२ शेतकऱ्यांना १०,२१,९४,२७२.६० इतकी मदत मिळणार आहे. नांदुरा तालुक्यातील ९,७०८ शेतकऱ्यांसाठी ८,७७,५५,५३५.३२ रुपयांची रक्कम मंजुर झाली आहे.लोणार: ९,४१८ शेतकऱ्यांना ७,२४,७०,९८७.०० इतकी मदत मिळणार आहे बुलढाणा: ३,६६८ शेतकऱ्यांना ६,६५,०२,३०६.२० मंजूर झाले आहेत.मोताळा तालुक्यातील २,४९१ शेतकऱ्यांना ४,००,०७,६३१.०१ ही रक्कम पिक विम्याची मिळणार आहे देऊळगांव राजा २,५२० शेतकऱ्यांना २,८५,३८,४९८.७४ मंजूर झाले आहेत. जळगांव जामोद तालुक्यातील १,०८८ शेतकऱ्यांना २,५५,५२,३५१.७७ ही रक्कम पिक विम्याची मिळणार आहे शेगांव तालुक्यातील ७५६ शेतकऱ्यांना २,२७,०२,२६४.८३ इतकी मदत मिळणार आहे.संग्रामपूर तालुक्यातील ६१२ शेतकऱ्यांना १,९२,३८,९७५.५५ मंजूर झाली आहे.मलकापूर तालुक्यातील २२५ शेतकऱ्यांना ५९,७१,९१७.२५ ही रक्कम मिळणार आहे.ही नुकसान भरपाईची रक्कम सष्टेबरच्या पहिल्या आठवडयात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याशिवाय राज्य शासनाकडे जिल्हयातील प्रलंबित दाव्या संदर्भांतही कृषि मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असुन ही प्रकरणेही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेत वाढ होणार आहे. त्याचा फायदा बुलढाणा जिल्हयातील शेतकऱ्यांनी पिक विमा संदर्भात तालुकास्तरीय पिक विमा कार्यालयाशी संपर्क साधावा कसे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.
