बुलढाना अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. डॉ. श्री सुकेशजी झंवर यांच्या हस्ते पिंपळगाव काळे सहकार संकुलाचा भूमिपूजन व शाखा स्थापनेचा सोहळा थाटात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी (मल्टीस्टेट) चे संस्थापक अध्यक्ष तथा सहकार, शिक्षण व समाजकार्य या त्रिवेणी क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला नवी दिशा देणारे, सदैव सेवाभाव, प्रामाणिकपणा, शिस्त व वक्तशीरपणा, दूरदृष्टीचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून ओळखप्राप्त सहकार महर्षी मा.भाईजी अर्थात श्री राधेश्यामजी चांडक यांच्या अमुल्य मार्गदर्शनाखाली भविष्याचा वेध घेत, कल्पक दृष्टीकोनातून पिंपळगाव काळे, ता- जळगाव जामोद, जि- बुलढाणा येथे सहकार विद्या मंदिर शाळा इमारत, बुलडाणा अर्बन शाखा कार्यालय व गोदाम (सहकार संकुल) तसेच शाखा स्थानांतरण सोहळा बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. डॉ. श्री सुकेशजी झंवर यांच्या शुभहस्ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला... यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.डॉ.किशोरजी केला यांच्यासह गावातील प्रतिष्टीत व्यक्ती माजी बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष संजय पांडव तसेच सर्व स्थानिक संचालक, विविध सामाजिक संघटना, महिला संघटना तसेच अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते... याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेच्या शाखा कार्यालयात स्थानांतरण सोहळ्या निमित्त संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री सुकेशजी झंवर यांच्या हस्ते गणेश पूजन व त्यानंतर फीत कापून शाखेचे व कुदळ मारून नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले... याप्रसंगी संस्थेचे संचालक मा.डॉ. श्री किशोरजी केला यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. श्री सुकेशजी झंवर यांचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला... सहकार संकुलाच्या या भूमिपूजन सोहळयासाठी उपस्थित पिंपळगाव काळे येथिल स्थानिक संचालक देवेंद्र भैय्या, सत्यनारायण राठी, गणेश धारस्कार, सागर भैय्या, मधुकर पांडव, अजय कोठारी, बंडूअप्पा जामोदे,डॉ. सागर टावरी, आनंद दैय्या, राजेश काळे, कृष्णकुमार अग्रवाल हे यांच्या हस्ते संस्थचे अध्यक्ष मा.डॉ. श्री सुकेशजी झंवर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच माहेश्वरी महिला मंडळ पिंपळगाव काळे यांनी सुद्धा बुलडाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.डॉ. श्री सुकेशजी झंवर यांचा सत्कार केला... याप्रसंगी , बुलडाणा अर्बनचे खामगाव विभागीय व्यवस्थापक श्री प्रकाश सावळे, स्थानिक शाखा व्यवस्थापक विजय मानकर तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...