निमखेडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न... आ.डॉ.संजय कुटे यांची उपस्थिती...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी- वायाळ, खेर्डा, पळशी सुपो येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर माननीय आमदार संजयजी कुटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान अंतर्गत तहसीलदार पवन पाटील यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे शिबिराप्रसंगी मान्यवरांचे स्वागत मूलनिवासींच्या पारंपारिक नृत्याने करण्यात आले.राज्यभर १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्यातीलच एक भाग छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर अभियानात विविध प्रकारचे दाखले वाटप, आदिवासी बहुल निमखेडी गावातील नागरिकांचे सातबारा दुरुस्ती, नवीन रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड, आरोग्य तपासणी, निमखेडी गावातील नागरिकांच्या मागणीनुसार डोळे व दात तपाससाठी नारायणा ट्रस्ट नांदुरा ची स्पेशल टीम कडून तपासणी, समस्या निराकरण, फार्मर आयडी,संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, घरकुल लाभार्थी प्रस्ताव इत्यादी लाभ देण्यात आले. प्रसंगी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज तथा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,आरोग्य तपासणीसाठी धानोरा आरोग्य मंदिर चे वैद्यकीय अधिकारी डॉ ऋषिकेश कुयटे व डॉ सोनाली सातव तथा टीम ने सहकार्य केले, दंत चिकित्सा नारायणा ट्रस्ट नांदुरा च्या डॉ स्नेहल दाभाडे यांनी केली, तसेच ट्रस्ट च्या वतीने नेत्र तपासणी करून गरजूना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उज्वलाताई पाटील, मडाखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कदम,पंचायत समिती जळगाव चे गटविकास अधिकारी संदिपकुमार मोरे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी,माजी जि प सदस्य अशोक काळपांडे, एकनाथजी वनारे, गुणवंत कपले, रसूलपूर गट ग्रामपंचायत च्या सरपंचा हसीना परवीन, उपसरपंच रवी बिबोकार, माजी सरपंच राजूभाऊ, माजी सरपंच अन्सार बाबू,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक, पटवारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन जि प म प्रा शाळा निमखेडी चे मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी तर मान्यवरांचे आभार जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील यांनी मानले..