जारीदा व डोमा शाशकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार..निकृष्ट कामामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात – संतप्त पालकांचा सरकारला इशारा..मेलघाटात शाशकीय कामात भ्रस्टाचाराची काळी सावली...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा आदिवासी प्रकल्प विभाग धारणी अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रम शाळा जारीदा व शासकीय आश्रम शाळा डोमा येथे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भ्रष्ट कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असून,प्रकल्प अधिकारी कार्यालय चे भ्रष्ट अधिकारी ,नियोजन अधिकारी,बांधकाम विभाग व या शाळेतील जवाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने हा गैरप्रकार उघडपणे सुरू असल्याचा पालकांचा आरोप आहे.जुनी इमारत पाडताना नियमाप्रमाणे जुन्या साहित्याचा (विटा, लाकूड, खिडक्या, लोखंड) लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र कोणताही लिलाव न करता लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले. त्याचबरोबर, रेतीऐवजी क्रशर सॅंड वापरून बांधकाम सुरू असल्याने इमारतीचा दर्जा ढासळेल आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येईल, अशी गंभीर भीती व्यक्त करण्यात आली आहे.“विद्यार्थ्यांच्या डोक्यावर उभी राहणारी इमारत जर कोसळली तर जबाबदार कोण? आमच्या लेकरांचा जीव धोक्यात घालून हे भ्रष्टाचाराचे खेळ सुरू आहेत, आम्ही गप्प बसणार नाही,” असा संतप्त इशारा पालकांनी दिला.याविषयी अधिक संताप व्यक्त करत पालकांनी म्हटले की, “लाखो रुपयांचे साहित्य गिळंकृत झाले आहे. रेतीऐवजी धुळीचा वापर करून इमारत उभी केली जातेय. हा उघड भ्रष्टाचार आहे.प्रकल्प कार्यालयतील अधिकारी,नियोजन विभाग,व या शाळेतील जवाबदार अधिकारी व कर्मचारी हे सारे या भ्रस्ट कामामध्ये मध्ये सामील आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे.”शासनाला थेट आव्हान देत पालकांनी मागणी केली की, या भ्रष्ट कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करून जबाबदार व प्रामाणिक ठेकेदाराकडे काम सोपवावे. तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी.या आधीही मेलघाटातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांना व विद्यार्थांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून पालकवर्गाने आक्रोश व्यक्त करून या कामाची चौकशी झाली नाही तर शासनाविरुद्ध आंदोलन छेड़ण्याचा इशारा दिला आहे.