शिवसेना मुख्यनेते एकनाथराव शिदे यांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली सदिच्छा भेट..! लालबागच्या राजा चे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले दर्शन..!
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सदिच्छा भेट घेतली .तसेच लालबागचा राजा श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेवुन सर्व जनतेला चांगले निरोगी आयुष्य दे असे साकडे घातले. केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे 2 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली या दोन्ही नेत्यामध्ये देशासंह राज्यातील आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण विभागाच्या विविध महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली .यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,ठाणे महानगरपालिकाचे माजी नगरसेवक .संजय सोनार व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई शहरातील लालबागचा राजा श्री गणरायाचे दर्शन ही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले लालबागच्या राजा चरणी नतमस्तक होतानाच सर्व जनतेला चांगले निरोगी आरोग्य दे असे साकडे श्री गणराया चरणी घातले ...
