अंबाबारवा अभयारण्याचे बफर क्षेत्रात मेंढी चराई करणाऱ्या एकास अटक...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अवैधरीत्या अंबाबारवा अभयारण्याचे बफर क्षेत्र पिगळी बिट मध्ये मेढी चराई करणे बाबत.वनअधिकारी ए.एन बावने वनपरीक्षेत्र अधिकारी सोनाळा यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे पिंगळी बिट बफर क्षेत्रात अवैधरीत्या मेढी चराई करतांना १८० मेढी चराई करतांना आढळून आला असून आरोपी नंदु सोनाजी डोमाळे रा. पिंगळी जाहा. ता. संग्रामपुर जि. बुलढाणा यांना मुददेमालासह मोक्यावर ताब्यात घेण्यात आले. त्याचे भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (1-A) (a) ५२ प्रमाणे वनगुन्हा क्र. ०५९९०/१४९७४० दिनांक ९ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला.सदरची कार्यवाही आदर्श रेडडी भावसे. वनसंरक्षक, तथा क्षेत्रसंचालक मेव्याप्र.अमरावती आर एस टोलिया (भावसे.) उपवनसंरक्षक,अकोट वन्यजीव विभाग अकोट,जी पी टेकाळे सहा. वनसंरक्षक अकोट वन्यजीव विभाग अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा हे तपास करीत आहे.ही कार्यवाही सोनाळा परीक्षेत्रातील ए एन बावने वनपरीक्षेत्र अधिकारी सोनाळा, एस डी राठोड वनपाल, एस के घुगे वनपाल,पी ए जगरवाल वनरक्षक, के एच मोरे वनरक्षक,डी ए बेराड वनरक्षक, व सोनाळा परीक्षेत्राचे अधिनस्त कर्मचारी. सहभागी होते सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की अशी कोणतीही माहीती मिळताच १९२६ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी.