न्यायालयाच्या इमारत बांधकामासाठी आ.डाँ.संजय कुटे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर...बार असोसिएशन जळगाव च्या वतीने आ डॉ संजय कुटे यांचा सत्कार...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक 10 सप्टेंबर रोजी मतदारसंघाचे आ डॉ संजय कुटे यांचा जळगाव जामोद बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.शहरात जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन होण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. सीसीबी-1125/प्र.क्र.66/का-13 दि.9/9/2025 नुसार जळगाव जामोद जि. बुलढाणा येथील न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल बांधण्याबाबत 1,16,92,443/-रुपये इतक्या अंदाजीत खर्चाच्या कामास या शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सदर बाबीचा पाठपुराठा करण्यामध्ये सिहांचा वाटा असणारे जळगाव जामोद विधान सभा मतदार संघाचे विकास पुरुष व लोकप्रिय आमदार माजी कॅबीनेट मंत्री डॉ. संजय कुटे यांचा जळगाव जामोद वकील संघामध्ये दि.10/09/2025 रोजी जाहिर सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणुन वकील संघाचे अध्यक्ष अँड. मोहम्मद इरफान , कार्याध्यक्ष अँड.डी जी खेर्डेकर, सचिव एड आनंद जोशी तसेच सर्व जेष्ठ व सदस्य उपस्थित होते. सदर सत्कार समारंभामध्ये अँड. बावने यांनी त्यांच्या समधुर आवाजामध्ये एक उकृष्ठ नेता विश्वविजेता आहात आपण, आपणाच मान, आपणच ज्ञान, जळगाव जामोद शहराची शान आहात आपण, जळगाव जामोद वकील संघाची आण, गुणवान रत्नाची खाण सेशन रुपी मोहिमेचे कर्तृत्वरुपी उधाण आहात आपण ही कौतुकास्पद कविता सादर केली. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना अँड. दत्तात्रय गंगाराम खेर्डेकर कार्यकारी अध्यक्ष वकील संघ जळगाव जामोद यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. निशा वानखडे यांने केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. स्वप्नील राजपुत यांनी केले.