नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन पटकावले विजेतेपद...


 
नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन पटकावले विजेतेपद...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

दिनांक 9 सप्टेंबर 2025 हा दिवस नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 1 जळगाव जामोद साठी ऐतिहासिक ठरला कारण नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक 1  चे   विद्यार्थ्यांनी शालेय क्रिकेट स्पर्धा (चौदा वर्षे खालील वयोगट) मध्ये पहिल्यांदाच सहभाग घेऊन विजेतेपद पटकावले ,९ सप्टेंबर ,वार मंगळवार रोजी अंतिम सामना नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक under 14 Boys आणि स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद यांच्यामध्ये झाला ,नगरपालिका  उर्दू शाळा क्रमांक 1 ने पहिले फलंदाजी करताना  5 over मध्ये 48 धावांचा डोंगर स्वामी समोर उभा केला. आणि त्यांना 5 over मध्ये 33 रन वर  थांबवून पंधरा धावानी सामना जिंकून विजेतेपद पटकावले. सदर शालेय क्रिकेट स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक वहीद खान सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे मागच्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांनी मोहम्मद फैसल सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस के कॉलेज या ग्राउंडवर  तयारी केली होती, शाळा सुटल्यावर साडेपाच च्या नंतर विद्यार्थी ग्राऊंड वर यायचे व फैसल सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायचे आणि यांच्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले आणि संघाचे कर्णधार पद वर्ग सातवी चे विद्यार्थी उजे़र खान जहीर खान यांनी चांगल्या प्रकारे निभावले याला साद ईकबाल व राशिद खान ,अयान,अबुबकर ,अबुजर यांनी चांगली साथ दिली आणि आपल्या शाळेला ऐतिहासिक विजेतेपद मिळून दिले.

Previous Post Next Post