तेली पंच मंडळाचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी.....
5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव जामोद येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहा मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे होते.समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठ उपलब्ध होऊन योग्य मार्गदर्शन मिळावे. त्यातून सुविध्य नागरिक बनावे, तथा समाजात योग्य मानसन्मान मिळवावा हा उदात्त हेतू ठेवून तेली समाज पंचमंडळ जळगाव जामोद सर्व समाज बांधव यांच्या अथक परिश्रमामुळे मागील 22, वर्षापासून सदर कार्यक्रमाचे आयोजन होत असते. असे आयोजकांनी सांगितले. तसेच समाज पंचमंडळाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतात. सदर कार्य हे प्रेरणादायी असून समाजासमोर एक आदर्श आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश आकोटकर सर,विभागीय सचिव महाराष्ट्र तैलिक महासभा अकोला. प्रमुख अतिथी म्हणून विजय अडचुले खामगाव, प्रदीप भागवत सर जळगाव,विलासराव खवणे जळगाव, संजय पांडव भाजपा तालुकाध्यक्ष जळगाव, गणेशराव जामोदे अध्यक्ष तेली समाज पंचमंडळ जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते दगडूजी भगत आणि ज्येष्ठ समाजसेविका सुमनबाई कपले यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेली समाजातील एकूण 35 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले. यामध्ये इयत्ता चौथी चे 8, इयत्ता सातवीचे 5, इयत्ता दहावीचे 10, इयत्ता बारावीचे 2, पदवीधर 2, शिष्यवृत्ती प्राप्त 6, अवार्ड प्राप्त 2, विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेली समाज पंचमंडळाचे सचिव श्याम पांडव यांनी केले. विजय अडचुले, प्रदीप भागवत सर,संजय पांडव, रमेश आकोटकार सर यांची समायोजित भाषणे झाली .कार्यक्रमाचे संचालन कु.स्वानंदी नंदकिशोर काथोटे आणि नंदकिशोर काथोटे तर आभार प्रदर्शन संजय चोपडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश जामोदे,राजेंद्र काथोटे, श्याम पांडव, नंदकिशोर काथोटे, रमेश आकोटकर,संजय चोपडे, प्रा. रवींद्र खवणे,सागर काचकुरे, प्रफुल्ल कावरे, मंगेश मंडवाले शरद खवणे, गणेश अरुडकार, दुर्गादास आकोटकार,संतोष वेरूळकर,अनिल भगत,संजय पांडव, मोहन कावरे, विनोद चिपडे, रवींद्र जामोदे, विजय चिपडे, राजेंद्र कपले, वासुदेव चिपडे तथा समाज बांधव सहित संताजी महिला मंडळ व संताजी युवक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.