आ. डॉ. संजयजी कुटे सपत्नीक भाजी बाजारात जातात तेव्हा..
स्वतःमध्ये ‘साधेपणा’ असणे… ही गोष्ट तितकी साधी नसते. पण ज्यांचं आयुष्यच लोकांशी नाळ जोडून आहे, त्यांच्यासाठी हेच त्यांचं खरं बळ ठरतं. याचं उत्तम उदाहरण नुकतंच जळगाव जामोद येथे पाहायला मिळालं.जळगांव जामोदच्या गजबजलेल्या भाजी बाजारात अचानकपणे आमदार डॉ. संजयजी कुटे सपत्नीक आले. हातात साधं पिशवी घेतली आणि सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भाजीपाला खरेदी करायला सुरुवात केली. बाजारात भाजी विक्रेते, शेतकरी आणि ग्राहकांसोबत ते निवांतपणे गप्पा मारत होते. “भाजीचा भाव किती? पीक कसं झालं? कष्टाला योग्य दर मिळतोय ना?” – असे आपुलकीचे प्रश्न विचारून त्यांनी प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी बाजारातील नागरिकांचे डोळे आश्चर्याने चमकले. त्यांच्या तोंडून आपोआपच एकच वाक्य बाहेर आले – “किती साधा माणूस आहे हा…!” सत्ता, मानपान, मोठं पद असूनही जमिनीवर पाय ठेवून चालणारा आपला आमदार पाहून लोक भारावून गेले.सामान्य माणसाच्या जीवनाशी स्वतःला जोडून घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्यात मिसळून त्यांचं सुख-दुःख जाणून घेणं… हेच खरं लोकनेतृत्व असतं. आजच्या राजकारणात जेथे दिखावा, तडक-भडक आणि वेगळेपणा दाखविण्याची स्पर्धा आहे, तेथे डॉ. संजय कुटे यांचा साधेपणा लोकांसाठी एक वेगळीच प्रेरणा ठरत आहे.लोकांना नेता मोठेपणाने नव्हे, तर साधेपणाने जवळ करतो. आणि हेच साधेपण लोकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवतं.
"साधेपणाची ही वाट – खरी लोकनेत्याची ओळख आहे"
- अनिल उंबरकर शेगाव