आकी येथिल नविन ग्रामपंचायत इमारीतीच्या कामात माती मिक्स रेतीचा वापर...



 
आकी येथिल नविन ग्रामपंचायत इमारीतीच्या कामात माती मिक्स रेतीचा वापर...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील सोळा गावाच्या ठिकाणी नविन ग्रामपंचायत इमारतीचे कामे सुरू आहेत.परंतु पुष्कळ गावाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने या इमारतीच्या कामात सर्रास माती मिक्स चोरीची रेतीचा वापर करीत असल्याचे चित्र चिखलदरा तालुक्यातील आकी या गावाच्या ग्रामपंचायत मधिल इमारतीचे बांधकामात दिसुन आले आहे.बोलल्या जात आहे.या बांधकामात ग्रामपंचायत येथिल पदाधिकारी यांचे लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु असे काही होत नसल्याने येथील कंत्राटदार आपल्या मनमानीपणे काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आकी येथिल नविन इमारतीचा काम हा बोगस रित्या झाल्या मुळे या कामात अधिकारी यांचे लक्ष असने हे पण तितकेच सत्य मानल्या जात आहे.या इमारतीच्या कामात अधिकारी काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे.

Previous Post Next Post