पिक विम्यासाठी शिवसेना उबाठा चा तालुका कृषी कार्यालयाला घेराव... पिक विम्याची रक्कम त्वरित अदा करा. निवेदनाद्वारे मागणी...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगांव जामोद तालुक्यातील सन २०२४ ते २०२५ मध्ये एकुण २६,५६१ शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर झाला. यामधील ४०७४ शेतक-यांना यापुर्वी ७,७३,५८, १८७/-रूपये विमा वाटप करण्यात आला. सप्टेंबर २०२५ मध्ये शासनाने तालुक्यातील फक्त १०८८ शेतकऱ्यांना २,५५,५२,३५१/- इतकी रक्कम २ सप्टेंबर रोजी अदा करण्यात आली. विमा मंजुर शेतकऱ्यांच्या एकुण संख्येतुन ५,१६२ शेतकरी वगळता अजुन २१,३९९ शेतकरी पिकविम्या पासून वंचीत आहेत. बुलढाणा जिल्हयात मंजुर झालेल्या पिक विमा शेतक-यांमध्ये जळगांव जा. तालुक्याचा नंबर खालुन दुसरा आहे. त्यातही अत्यल्प शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम वितरीत करण्यात आली. पिक विमा कंपन्या कोट्यावधी रूपये शेतकऱ्यांकडून प्रिमियम वसुल करतात. मात्र त्यामधील २५ टक्के सुध्दा विमा रक्कम वाटप करित नाहीत. महाराष्ट्र शासन व विमा कंपन्या शेतक ऱ्यांचे आर्थीक शोषण करित आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप १७, २७,८२,४३२.१३ रूपये विमा रक्कम घेणे आहे. दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित पिक विमा वितरित करण्यात यावा अन्यथा दिनांक एक ऑक्टोबर रोजी तालुका कृषी कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचा इशारा तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष दांडगे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान,विधानसभा संघटक भिमराव पाटील, शहर प्रमुख रमेश ताडे, प्रसिद्धीप्रमुख सुधीर पारवे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील, संकेत रहाटे,सुभाष माने,संतोष डब्बे, गजानन मांडेकर, कैलास राजपुत,तुकाराम वानेरे,सुभाष गिर्हे, बाबुराव बगाडे,तुकाराम कोकाटे, किशोर कपले,संकेत कपले, गजानन बाठे , अजित देशमुख, कैलास राऊत , गजानन राऊत, राजेश गावंडे,मधुकर झाटे, पवन भुसारी यांचे सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.