वान नदीत घरघुती गणेश मूर्तीचे अनंत चतुर्थीला विसर्जन...वारखेड सोगाडाच्या मध्यभागातून वाहते ही नदी..
हिवरखेड प्रतिनिधी.....
हिवरखेड नजीक येत असलेल्या वारखेड सोगोडा फाट्याच्या मध्यस्थी असलेली ही वान नदी येथे अंनतचूर्तुथीला भाविकांनी आपल्या घरात विराजमान झालेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले,या वान नदी मध्ये गणेश विसर्जन बघण्यासाठी व बाप्पाला निरोप देण्यासाठी पुरुषांसह भाविक महिलांची सुध्दा गर्दी दिसून आली,अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला बाप्पाच्या कानात सागून आपले मागणे मागितले व गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या अशी घोषणा केली,तसेच या वान नदीचे पाणी हनुमान धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी वाढत होती, म्हणुनच सर्वांना आधीच सतर्क राहण्याचा इशारा दिला होता, गणेश विसर्जनात खालून नदीचे पाणी व वरून वरुणराजा प्रसन्न पाहण्यास मिळाले, या ठिकाणी वारखेड, सोगाडा,वारी, सोनाळा, तळेगांव, खंडाळा, सौदळा,कार्ला, हिंगणी, गोरधा, व हिवरखेड अशा आधी गावातील घरघुती गणेशमूर्तीचे भाविकांनी या स्थळी विसर्जन केले, तर काहींनी वारी भैरवगड येथे हजेरी लावली...