चेन्नई शंकर नेत्रालयात बालकांचे यशस्वी नेत्रोपचार...१० महिन्यांचे चंदन व चेतन जगदीश जांबेकर यांचे डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वी....
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्ह्यातील मेलघाट मधील बिबामल गावातील जुळी बालके चंदन व चेतन जगदीश जांबेकर (वय १० महिने) यांचे डोळ्यांचे जटिल ऑपरेशन चेन्नई येथील शंकर नेत्रालयात यशस्वीरीत्या पार पडले.२१ ऑगस्ट रोजी समुपदेशक काल्या कासदेकर (प्रा. आ. केंद्र, साद्राबाडी) यांच्या सोबत ही दोन्ही बालके उपचारासाठी चेन्नई येथे दाखल झाली होती. उपचार कालावधी दरम्यान तब्बल २७ दिवस तेथे राहून संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.२ सप्टेंबर रोजी नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रमोद भेंडे सरांच्या टीमने चेतनच्या एका डोळ्याचे ऑपरेशन केले व ते यशस्वी ठरले. त्यानंतर चंदनचे ऑपरेशन होणार होते, मात्र अचानक तब्येत बिघडल्याने तिला मुर्गन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारांनंतर ९ सप्टेंबर रोजी चंदनचेही एका डोळ्याचे ऑपरेशन यशस्वी झाले.या प्रयत्नांमुळे आज या दोन्ही बाळांना जग पाहण्याची नवी संधी मिळाली आहे.
♦️विशेष सहकार्य :-
डॉ. कविता सातव मॅडम, डॉ. सातव सर यांच्या मदतीने डॉ. प्रमोद भेंडे सर आणि त्यांच्या टीमने हे महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया कार्य मोफत केले. याशिवाय आर्य समाज फाउंडेशन, चेन्नई तर्फे निशी मॅडम, नेहा भारद्वाज मॅडम व आनंद सर यांनी निवास व जेवणाची व्यवस्था केली.त्याचबरोबर डॉ. सातव सर, THO वानखडे मॅडम, SDH धारणी येथील डॉ. जावरकर सर, बाविस्कर सर (पुणे), डॉ. प्राजक्ता साबळे मॅडम, प्रा. आ. केंद्र साद्राबाडीतील समुपदेशक, ANM जयश्री राठोड व अर्चना धुर्वे, गटप्रवर्तिका मंजु खंडेलवाल तसेच वाहन चालक फुलचंद दादा व चिंटू दादा यांनी दिलेले सहकार्य मोलाचे ठरले.आर्थिक मदत करणाऱ्या मान्यवरांचेही योगदान लक्षणीय आहे. अखेरीस दोन्ही बालके दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुखरूप आपल्या गावी परतली.